इगतपुरीनामा न्यूज, दि. 1
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोलीच्या उपसरपंचपदी बबाबाई महाले यांची निवड झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी तुकाराम तांबडे यांची निवड झाली होती. आज उपसरपंच निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी माजी चेअरमन यशवंत महाले, दशरथ महाले, ज्ञानेश्वर महाले, सोपान महाले, कोंडाजी महाले, तुकाराम महाले, कचरु महाले, आबा महाले, मुरलीधर महाले, संजय महाले, प्रेमराज महाले, शंकर ढगे, ज्ञानेश्वर वाघमारे, सोमनाथ महाले, राजु महाले, लाला महाले, रघुनाथ महाले, धनाजी महाले, गोकुळ ठाणगे, संतोष महाले उपस्थित होते.
सरपंच तुकाराम तांबडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीत सर्वानुमते बबाबाई महाले यांची निवड करण्यात आली. उपसरपंच म्हणून निवड जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजून स्वागत केले. गावातून मिरवणूक काढत गुलालाची उधळण करण्यात आली. नवनिर्वाचित उपसरपंच बबाबाई महाले यांनी सर्वांचे आभार मानून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करून विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनिता महाले, फुला शिंदे, मनीषा तांबडे, शंकर आचारी, सिंधु आचारी, संपत महाले, शशिकांत तांबडे, विस्ताराधिकारी बाळु पवार, ग्रामसेवक अनिल सुपे उपस्थित होते.