मोडाळेच्या विकासाची प्रेरणा अन्य गावांनीही घेऊन ग्रामविकास साधावा – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; “गोदा सन्मान” पुरस्काराने मोडाळे गाव सन्मानित : गोरख बोडकेंच्या मदतीने मोडाळेच्या शाश्वत विकासाची वाटचाल कौतुकास्पद : माजी मंत्री गिरीश महाजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

गावकऱ्यांनी एकदा ठामपणे ठरवले तर आपलं गाव विकासाच्या उंचीवर नेण्यापासून त्या गावाला कोणीही रोखू शकत नाही. याचप्रकारे विकासाचा ध्यास घेऊन अत्यंत कमी काळात मोडाळे गावाने केलेला विकास देशाच्या प्रत्येक गावांनी पाहायला हवा. गोरख बोडके यांची विकासाची आत्मीयता अनेक गावांना खऱ्या अर्थाने ग्रामविकास साधायला निश्चितच मदत करील. मोडाळे गावापासून प्रेरणा घेऊन अन्य गावांनीही येणाऱ्या काळात अधिकाधिक विकास साधावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाशिक येथे “गोदा सन्मान” पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी त्यांनी मोडाळे गावाच्या कामगिरीचा गौरव केला.

विकासाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी माझ्या मोडाळे गावातील प्रत्येकाने आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नेहमीच कष्ट घेतले आहेत. ह्या प्रामाणिक कष्टांना माझ्याकडून नेहमीच आवश्यक ती मदत मी केलेली आहे. मागे वळून पाहताना मोडाळे गाव राज्याचे विकासाचे मॉडेल झाल्याचा आनंद वाटतो. यापुढेही ह्या गावासह अन्य गावांनाही विकासाचा आस्वाद देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचा शब्द देतो.

- गोरख बोडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य

याप्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, गोरख बोडके यांचे मोडाळे गाव झपाट्याने शाश्वत विकासाकडे वाटचाल करीत असल्याचे मी पाहतो आहे. या गावाला भेट द्यायला मला आवडेल. यासह उन्नत आणि समृद्ध असणाऱ्या गावकऱ्यांचे मी कौतुक करतो. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली सरपंच मंगला बोंबले, उपसरपंच सिताबाई शेंडगे, ग्रामसेवक नानासाहेब खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य अंजना बोडके, संतोष बोडके, विठ्ठल जगताप, बीजलाबाई गोऱ्हे, आशा धात्रक, विमल शिंदे, ज्ञानेश्वर झोले, लंकाबाई ढोन्नर यांनी “गोदा सन्मान” पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!