विवाह सोहळ्यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन : आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे यांचा उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज – लग्न समारंभात पारंपारिक लग्न  पद्धत, हुंडा,मानपान यांना फाटा देत आदिवासी शिक्षक संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे पथक आणले होते. यातून विविध देखावे, नृत्य सादरीकरण करण्यात आले. आदिवासी संस्कृतीवर्धक उपक्रम सादर करत एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडल्याने सर्वत्र या विवाहाचे कौतुक झाले. इगतपुरी येथील सुमन तळपाडे व इगतपुरीचे केंद्रप्रमुख आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे यांचे चिरंजीव प्रा. नितीनचा विवाह शिवरे ता. चांदवड येथील अनिता व विष्णू फकीरा सताळे यांची कन्या बँक अधिकारी कु. सोनाली यांचा विवाह सोहळा वणी येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मानपान, हारतुरे यांना फाटा देत आदर्श विवाह सोहळा साजरा व्हावा अशी एकमेकांकडे चर्चा झाली. यातून आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी विविध पथकांचे विवाह सोहळ्याप्रसंगी मिरवणुकीत सादरीकरण करण्याचा निर्णय झाला. वरात मिरवणुकीत विविध पोशाख परिधान आदिवासी पथकांनी आदिवासी संस्कृतीवर प्रकाश ज्योत टाकत नृत्य व नाटक सादरीकरण करून आदिवासी समाजातील विविध सण, उत्सव याचे उत्तम दर्शन घडवले. वरातीत डीजेला फाटा देत आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करणारा उपक्रम राबविल्याने सर्वत्र विवाहाचे कौतुक झाले. या सोहळ्याचा वऱ्हाडी मंडळींनी आनंद घेतला.

आमदार हिरामण खोसकर, गटशिक्षणाधिकारी पाटील, पीएसआय रमेश ढोन्नर, कॉन्स्टेबल धनंजय दोबाडे, उपसरपंच ज्ञानेश्वर झोले, भाऊ भुरबुडे यांच्यासह उपस्थित राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक केले. आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मोतीराम पवार, महासंघटक हिरामण चव्हाण, उत्तम भवारी, राज्य नेते चंद्रकांत लहांगे, स्वाभिमानी शिक्षक संघटना राज्याध्यक्ष काशिनाथ भोईर, शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, संचालक उमेश बैरागी, जिजा मारुती खाडे, प्रभाकर चव्हाण, जिल्हा सरचिटणीस तुकाराम भोये, धनराज वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र लहारे, जिल्हा कोषाध्यक्ष हरिश्चंद्र भोये, जिल्हा उपाध्यक्ष देविदास देशमुख, माजी चेअरमन जनार्दन करवंदे, पांडुरंग आंबेकर, नामदेव साबळे, तुकाराम सारुक्ते, अंकुश तळपे, प्रकाश तळपे, मधुकर रोंगटे, बेंडकुळी सर, नवनीत झोले, बाबूलाल सोनवणे, कैलास बोराडे, चंद्रकांत गायकवाड, सुनील मोरे, रवी पगारे, राजू मनोहर, डॉ. पाटील, गोरख तारडे, रामदास कवठे, तालुका नेते कैलास भवारी, पांडुरंग पवार, शांताराम गवळी, दिलीप तलवारे, तालुकाध्यक्ष भाऊराव बांगर, रामदास कराटे, उत्तम वाघमारे, सचिन कापडणीस, तालुका सरचिटणीस मारुती कुंदे, सुनील सांगळे, भिला अहिरे, हुकुमचंद पाटील, पत्रकार हिरामण गोडे, दीपक भदाणे, दिलीप धांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर,प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!