कसारा बायपास जवळ दुधाचा टँकर पेटला : गस्त पथकाने तासाभरात आग आणली आटोक्यात

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

कसारा बायपास जवळ मुंबईकडे जाणाऱ्या दुधाच्या टँकरने आज पहाटे सव्वातीन वाजता अचानक पेट घेतला. त्याचा क्रमांक MH 17 BY 3338 असून चालत्या गाडीने पेट घेतल्याने ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून आपले प्राण वाचवले. ही घटना मुंबई नासिक एक्सप्रेसवेचे गस्त पथक अधिकारी रवी देहाडे यांना मोबाईलवरून समजली. श्री. देहाडे हे तात्काळ आपल्या गस्तपथक टीम सोबत घटनास्थळी पोहचले. सुरुवातीला मातीच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला पण आगीचा डोंब उसळतच होता.

रवि देहाडे यांनी दूध टँकरचे मागील लॉक तोडून बादलीच्या साहाय्याने आपले सहकारी राजू उघडे, सचिन भडांगे यांच्या मदतीने १ तासाच्या आटोकाट प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. या आगीमुळे वाहतुकीला १ तासभर खोळंबा झाला. याकामी मुंबई नासिक एक्सप्रेसवेच्या कर्मचाऱ्यांना कसारा पोलीस स्टेशनचे पोलीस श्री. तिडके रोंगटे यांनी मदत केली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!