
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बॉक्सिंग खेळाडू धवल जयसिंग पडाया याने यश मिळवले आहे. त्याने लातूर येथे झालेल्या ७९ व्या राज्यस्तरीय युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धामध्ये ७१ कि. ग्रॅ. व ७५ कि. ग्र. गटात ब्राँझपदक प्राप्त केले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाला क्रीडा संचालक प्रा. एच. आर. वसावे, क्रीडा शिक्षक अहिरे, अंतर्गत गुणवत्ता सेलचे समन्वयक प्रा. एस. एस. परदेशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एस. बी. फाकटकर, प्रा. चौधरी उपस्थित होते. या यशाबद्दल धवलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.