माणिकखांबजवळ मोटारसायकल अपघातात पती पत्नी आणि मेहुणी गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

मुंबई आग्रा महामार्गावर माणिकखांब जवळ वळण घेणाऱ्या ट्रकला मोटरसायकल धडकल्याने आज दुपारी १ वाजता अपघात झाला. ह्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा येथील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. ह्या अपघातात संतोष काशिनाथ ठाकरे वय 24, आरती संतोष ठाकरे वय 22, कल्पना भाऊ इरते वय 15 हे तिघे गंभीर जखमी झाल्याचे समजते. ह्यामध्ये पतिपत्नी आणि मेहुणी यांचा समावेश आहे. मोटारसायकलीचा क्रमांक MH 15 ED 6510 असून ट्रकचा क्रमांक MH 05 DK 5314 असा आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!