वैतरणा धरण परिसरात आढळला खून करून अर्धवट जाळलेला मृतदेह : घोटी पोलिसांकडून वेगाने तपासकार्य सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

धारगाव शिवारात वैतरणा धरणाच्या जवळ अज्ञात अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला आहे. राजाराम खातळे यांचे शेताच्या परिसरात आज सकाळी ही घटना निदर्शनास आली. घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासकार्याला सुरुवात केली आहे. धारगावचे पोलीस पाटील लक्ष्मण बाबुराव खातळे यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली असून घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, अज्ञात आरोपीने अनोळखी मयतास अज्ञात कारणासाठी त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने गंभीर जखम करुन जिवे ठार मारले. त्याचे प्रेत कोणाला दिसु नये म्हणुन त्याचा पुरावा नष्ट केला. त्यासाठी वैतरणा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला राजाराम खातळे यांच्या शेताचे कोपऱ्यावर सफेद रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्या टाकुन प्रेत जाळुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून पोलीस पाटील लक्ष्मण बाबुराव खातळे यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घोटी पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखला केला आहे. घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास घोटी पोलिसांना याबाबत कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!