रेल्वेमधुन ७ मोबाईल व १ लॅपटॉप चोरी झालेला माल हस्तगत : इगतपुरी लोहमार्ग पोलीसांची प्रभावी कामगिरी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 21

मुंबई ते हावडा, मुंबई ते उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या मार्गावरील धावणाऱ्या मध्यरेल्वेच्या धावत्या रेल्वे मेल, एक्सप्रेसमधुन ७ मोबाईल व १ लॅपटॉप इगतपुरी रेल्वे स्थानकादरम्यान चोरी झालेले २ लाख १० हजार रुपये किमतीचा माल इगतपुरी लोहमार्ग पोलीसांनी हस्तगत करून प्रभावी कामगिरी केली आहे. अधिक माहिती अशी की, इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत दिवाळीमध्ये चालु रेल्वे गाडयांमध्ये मोबाईल व बॅग चोरीचे गुन्हे घडले होते. याबाबत औरंगाबाद लोहमार्गच्या पोलीस अधिक्षिका मोक्षदा पाटील यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, लोहमार्ग औरंगाबाद सायबर सेलच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांना सुचना व मागर्दशन करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचित केले होते.

त्यानुसार सायबर सेलकडुन चोरीस गेलेले मोबाईल ट्रेसिंग करुन इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशनच्या पथकामार्फत कौशल्यपुर्ण तपास करुन संशयित आरोपींचा शोध घेऊन अटक केली. त्यांनी चोरलेले मोबाईल व लॅपटॉप त्यांच्याकडुन मुंबई, नाशिक, मालेगाव, शिर्डी येथे तपास करून पश्चिम बंगाल येथुन चोरीस गेलेले ७ मोबाईल व १ लॅपटॉप असा एकुण २ लाख १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशनकडील ६ गुन्हे उघडकीस आणले आहे. जप्त मुदेदमाल हा तात्काळ फिर्यादी यांना परत करण्यात आला. ही कामगिरी लोहमार्ग पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक काजवे यांचे मार्गदर्शनाखाली इगतपुरी लोहमार्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, लोहमार्ग औरंगाबाद सायबर सेलचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल देशमुख, पोलीस हवालदार हेमंत घरटे, गौतम गवारगुरु, धनंजय नाईक, संजीव पारधी, राजेंद्र बोराळे, हारुण शेख, संतोश परदेशी, तुषार मोरे, राजेश बागुल, पोलीस नाईक सुजाता निचड, सविता शिंदे, अमोल निचत, निरज शेंडे, वैभव पाटील, दिनेश चामनार व सायबर सेलच्या पथकातील अंमलदार यांनी केली आहे.

Similar Posts

गरोदर मुलीने नाव घेतले ; बदनामीच्या भीतीने युवकाने घेतला गळफास : वावी हर्षचा मुलगा तर मुंढेगाव भागातील मुलगी

वाहतुकीचा खेळखंडोबा – पिंपळगाव टोल प्रशासन, महामार्ग विभागाचे अधिकारी, वाहतूक पोलीस यंत्रणा आणि ठेकेदाराच्या ४२ पिढ्यांचा होतोय उद्धार : जबाबदार अधिकाऱ्यांच्या तोंडाला उद्या शिवसैनिक काळे फासणार – शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांचा इशारा

Leave a Reply

error: Content is protected !!