धामणगावचे तलाठी झाले आता मंडळ अधिकारी : कमरुद्दीन सैय्यद यांची इगतपुरी तालुक्यातून एकमेव पदोन्नती

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे कार्यरत असलेले अभ्यासू आणि लोकाभिमुख तलाठी कमरुद्दीन सैय्यद यांची मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती झाली आहे. महसुली क्षेत्रातील अभ्यास, कामांचा अनुभव, लोकांशी स्नेह, कामात गतिमानता अशी वैशिष्ठे कमरुद्दीन सैय्यद यांची आहेत. इगतपुरी तालुक्यातून तलाठ्यांमधून त्यांचीच एकमेव निवड झालेली आहे. जिल्हाभरात २३ जणांची पदोन्नती झाली असून यामध्ये श्री. सैय्यद यांचा समावेश आहे. इगतपुरी तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचे मूळ गाव जाखोरी ता. नाशिक असून ह्या गावातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या तरतुदीनुसार सेवा जेष्ठतेने मंडळ अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी नाशिक जिल्ह्यात प्रक्रिया राबवण्यात आली. विभागीय पदोन्नती संमतीने त्यानुसार अंतिम निवडसूची तयार केली आहे. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील तलाठी कमरुद्दीन सैय्यद यांचे नाव असून त्यांची मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, तलाठी संघटना इगतपुरी, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे आदींनी अभिनंदन केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!