आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकात युवकांना संधी द्या : गृहनिर्माणमंत्र्यांकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये युवकांना संधी द्यावी अशी मागणी इगतपुरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे इगतपुरी येथे आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचे स्वागत करत युवकांना संधी देण्याची मागणी केली असून त्यांनी देखील यावेळी सकारात्मक भूमिका घेत युवकांना आश्वासन दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष अनिल पढेर, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, उमेश खातळे, वसंत भोसले, किरण मुसळे, निलेश जगताप, सागर टोचे, वसीम सय्यद, भाऊ पासलकर, राहुल कांडेकर, अमोल खातळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.