

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
मुंबई येथील पेहेचान प्रगती फाउंडेशनकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही भगतवाडी, धामडकीवाडी, वाघ्याचीवाडी, बोर्ली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ह्या शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, सॅंडल, रेनकोट इत्यादी शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. पेहेचान प्रगती फाऊंडेशनच्या अध्यक्ष प्रगती अजमेरा व सर्वं सदस्य यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले. 2015 पासून पेहेचान प्रगती फाऊंडेशन यांनी इगतपुरी तालुक्यातील 24 शाळांना केलेली विविध मदत व योगदानाबद्दल राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी उपस्थित नवीन सदस्यांना माहिती करून दिली.


याप्रसंगी प्रगती अजमेरा, पूजा गगवाणी, सधानी दोशी, ललिता डिडवाणी, प्रेमलता जैन, मधू तोष्णीवाल, गुरुदेव कौर, पुष्पा केजरीवाल, कृष्णा केजरीवाल, राधा रुंगठा, हर्षा सोनी, सुशीला मालविया यांनी विविध साहित्य वितरण केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. विविध उपक्रम राबवण्याबाबत शिक्षकांकडून पूरक माहिती घेतली. यावेळी राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, भगतवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली आहेर, सौरभ अहिरराव, वाघ्याचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश ठाकरे, बोर्ली शाळेचे मुख्याध्यापक दिनेश दुर्गे आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

