वंडरलँड हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

इगतपुरी शहरातील वंडरलँड हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कोविड संसर्गाच्या काळात जनतेची काळजी घेऊन सुरक्षा व मदत केल्याबद्दल इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे व मध्य रेल्वेचे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचा सन्मान करण्यात आला. वंडरलँड हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष कीथ परेरा व मुख्याध्यापिका ऑलथिया परेरा यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक समाधान नागरे व सुधीर पाटील, मुरारी गायकवाड यांना सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थीनी कठोर व चांगला अभ्यास करावा, देशाचा नावलौकीक होईल असे काम करुन आदर्श नागरीक बनावे असा सल्ला यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना दिला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!