🌹”शेतकरी कुणा कळला नाही”!🌹

सालदार कोण आणि शेतकरी कोण,
               गणित साधे कळले नाही !
नाही भेटला कोण असा,
          ज्याने शेतकऱ्या छळले नाही !
शेतकरी धान्य वाटीत गेला,
            कधीच पोटभर जेवला नाही !
हंगाम नाही असा कोणता,
            बळी पुरता होरपळला नाही !
सामना केला दुष्काळाशी,
             संकट पाहून पळाला नाही !
सामोरा गेला संकटाना साऱ्या,
                 दुःख पाहून हरला नाही !
पचऊन टाकले दु:ख सारे,
        कधीच बळी पस्तावला नाही !
नुकसान होता शेती माती,
       बळी कधी घरात बसला नाही !
हिरव्या शेतात सुख पाहून,
           कधीच बळी हुरळला नाही !
शेती – पिका भाव न मिळता,
        शेतीची फारकत घेतली नाही !
शेती मातीत कष्ट करण्याची,
             आण कधी सोडली नाही !
काळ्या आईची सेवा करण्याची,
           जन्मभर नाळ तोडली नाही !
रुसून बसता पोटचं बाळ,
       त्यास लेमन गोळी दिली नाही !
शेतकरी नावाचा माणूस खरा,
       कधीच कुणाला कळला नाही !

कवी :- जी.पी.खैरनार, नाशिक ( कवी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक आहेत. )
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१

कवी जी. पी. खैरनार

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!