
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी जवळ भरधाव कार आणि मोटार सायकलची धडक होऊन अपघात झाला. ह्या अपघातात एक २५ वर्षीय युवक जागीच ठार झाला आहे. आज रात्री 8 वाजेच्या सुमाराला झालेल्या ह्या अपघाताला कारणीभूत असणाऱ्या कारचा क्रमांक MH 48 0068 असा आहे. मोटार सायकलचा क्रमांक MH 15 DJ 6819 असा आहे. घोटी टोलनाका आपत्ती टीमने मदतकार्य केले. ह्या अपघातात चिंचलेखैरे ता. इगतपुरी येथील मोटारसायकलस्वार बाळू मंगळु झुगरे वय २५ हा जागीच ठार झाला. घोटी टोलनाका रुग्णवाहिकेने त्याला इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तो जागीच ठार झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. इगतपुरी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून तपास कार्य सुरू केले आहे.