कवी – शशिकांत भगवान तोकडे, घोटीसंवाद : 7083020259 म्हणती माझी माय, बाळा नको जाऊ तु बाहेरकाळजी वाटते रे मला तुझी, कारणं बाहेर आहे तो आजार, कोण्या दुष्मनानं केला घात, आणून टाकीला वेशीवरराहू आपण घरात, खाऊ मिरची भाकरं, आसवं येती डोळ्यांच्या बाहेर, त्यांना नाही आधारसांभाळून आसवांचा भार करू त्या आजारावर वार, सुखात होतो आपण, पण घातलंय […]
काल झालेल्या जागतिक चिमणी दिनानिमित्त मीनाक्षी काटकर यांची कविता चिमणी चिव चिव चिमणीआली अंगणी।हळूच म्हणालीदेता का पाणी॥ चिव चिव चिमणीबसली झाडावर।म्हणते मला कशीदाणे द्या पसाभर॥ चिव चिव चिमणीउडत गेली शेजारी।काकूला मागू लागलीगोड गोड पूरी॥ चिव चिव चिमणीआली बघा शाळेला।वाचवा हो चिमणीसांगितले सगळ्याला॥ मीनाक्षी काटकर – सहा.शिक्षिकाजि.प.प्राथ.शाळा टाकळी, पं.स.दारव्हा जि.यवतमाळ
भटकंती“आभाळाचं छत,आण काळी माती वसरी,!रानोमाळ भटकंती करितो, सोबत फक्त बासुरी!! नको धन, नको धान, काळोखात ठाण !लेकराले चरायाला दे रे देवा, पसाभर रान!! दगडाची चूल, आण रिकामे ते मडके !उपाशी ह्या जठराला, झाके काळे घोंगडे!! कुनापाशी मांडू व्यथा देवा, चहुकडे रिकामे रान !मुक्या प्राण्यां आवाज देता, टवकारले ते कान!! नशिबाची भटकंती, दे वा चोहिकडे,!मातीलाही दया […]
“शेतकरी “वाह रे देवा मला तुम्ही जगाचा पोशिंदा केलं!पण माझ्या नशिबी शेवटी दुख:च आलं!!माझ्या कष्टानं सारं जग सुखी झालं!पण ऐन दिवाळीत माझं कुटुंब मात्र उपाशी मेलं!!घाम गाळूनी भेगाळलेल्या मातीलाही पाणी दिलं!आशेचा एक किरण दिसताच सावकाराने मातीमोल केलं!!दमडी दमडी गोळा करून पोटच्या पोरांना म्या शिकवलं!हाडाचे काड झाल्यावर त्याने मला अनाथ घोषित केलं!!आयुष्यभर मी दुसऱ्यासाठी जीवाचं रान […]
सालदार कोण आणि शेतकरी कोण, गणित साधे कळले नाही !नाही भेटला कोण असा, ज्याने शेतकऱ्या छळले नाही !शेतकरी धान्य वाटीत गेला, कधीच पोटभर जेवला नाही !हंगाम नाही असा कोणता, बळी पुरता होरपळला नाही !सामना केला दुष्काळाशी, संकट पाहून पळाला नाही !सामोरा गेला संकटाना साऱ्या, दुःख पाहून हरला नाही !पचऊन टाकले दु:ख सारे, कधीच बळी पस्तावला […]