माणिकखांबजवळ ग्रामीण पोलिसांच्या वाहनाला अपघात ;१ गंभीर तर १० जण किरकोळ जखमी  : पहिल्या अपघातातील ट्रक काढतांना झाला अपघात

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

मुंबई आग्रा महामार्गावर आज २ अपघात झाले. हा अपघात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना माणिक खांब जवळील वळणावर झाला. यामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांच्या व्हॅनला अपघात झाला. ह्या अपघातात एक जण गंभीर तर दहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांचे हे वाहन इगतपुरी येथे बंदोबस्तासाठी चालले होते.

मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखांब शिवारात झालेल्या अपघातातील नाशिक ग्रामीम पोलीस दलाच्या वाहनातील  जखमी पोलीस कर्मचारी
1) सपोउनी चंदर पांडुरंग घागरे, वय 58, पोलीस मुख्यालय ना.ग्रा.
2) सपोउनी संजय विष्णु पवार, वय 56, रा. कामठवाडा नाशिक
3) पोहवा 1120 पंढरीनाथ धोंडु झनकर, वय 52, कोणार्कनगर, आडगाव, नाशिक
4) पोहवा 152 योगराज जगन्नाथ पाटील, वय 50, गजानन नगर, जेलरोड नाशिक
5) पोहवा 2000 संजय पोपट बोंबले, वय 50 रा. प्रभातनगर, म्हसरुळ, नाशिक
6) पोहवा 1353 सुनिल भाऊसाहेब देशमुख, वय 40, रा. प्रभातनगर, आडगाव, नाशिक
7) पोहवा 1052 विष्णु धर्मा ठाकरे, वय 49, रा. मखमलाबाद, नाशिक
8) पोहवा 2399 चंद्रकांत तानाजी बच्छाव, वय 52, रा. जत्रा हॉटेल जवळ नाशिक
9) पोहवा 2238 आशिफ उमर शेख, वय 56, रा. तुळशी आय हॉस्पीटल जवळ नाशिक
10) पोना 2516 देविदास नथु पाटील, वय 55, रा. रुखमिनी नगर, नाशिकरोड
11) पोना 774 मनोहर पांडुरंग गावीत, वय 46, रा. जुने पोलीस मुख्यालय नाशिक
12) पोहवा दिंगबर देवजी शिंदे, रा. जुने पोलीस मुख्यालय ना.ग्रा.

पहिला अपघात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना माणिक खांब शिवारात वळणावर झाला. हिरव्या मिरचीने भरलेला ट्रक क्रमांक GJ 27 TT 8685 च्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक डिव्हायडर तोडून मध्यभागी उलटला. हा ट्रक काढत असतांना ग्रामीण पोलिसांचे वाहन अपघातग्रस्त झाले. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक एक लेनने संथगतीने सुरू आहे. वाहतूक पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रकला बाजू करण्याचे काम सुरू केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!