रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका

इगतपुरीनामा न्यूज, दि. २

मातृसेवा फाउंडेशन, ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो काढतो पण आता तुम्ही रोपटं ( झाड ) लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला बक्षीस मिळेल.
‘एक रोपटं लावा’ त्या रोपट्यासोबत सेल्फी फोटो काढून खालील ईमेलवर पाठवावा shikshak.dhyey@gmail.com किंवा व्हाट्स ऍप करा 7499868046 वरील पैकी सेल्फी एकाच ठिकाणी पाठवावा. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून याचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.
1) झाड देशी असावे
2) रोपटं लावतांनाचा फोटो काढतांना उभा मोबाईल ठेवावा ( धरावा ), तारीख आणि वेळ सेल्फी फोटोत आवश्यक.
3) संपूर्ण रोपटं आणि आपला चेहरा दिसेल असा सेल्फी असावा
4) सेल्फी सोबत आपली माहिती पाठवावी : संपूर्ण नाव, वय, पत्ता, मोबा नंबर, व्हाट्स ऍप नंबर, आपला पासपोर्ट फोटो, कोणते झाड लावले त्याचे नाव, इ माहिती आवश्यक आहे. ही माहिती न पाठविल्यास सेल्फीचा विचार केला जाणार नाही.
5) निवडक स्पर्धकांना शिक्षक ध्येयचा प्रिंट दिवाळी अंक कुरिअरने पाठविण्यात येईल.
6) उत्कृष्ट आणि ओरिजिनल सेल्फी पाठविणाऱ्या सर्धकांना डिजिटल शिक्षक ध्येयचे 50 अंक व्हाट्स ऍप वर पाठविण्यात येईल.
7) डिजिटल 7 जूनच्या शिक्षक ध्येय मध्ये आपला सेल्फी प्रसिध्द करण्यात येईल.
8) मागील वर्षांचा जुना सेल्फी, कुंडीतील रोपटं, कुठलीही बनवेगिरी, खोटेपणा करू नये, केल्यास तो फोटो बाद करण्यात येईल. शिक्षक ध्येय चे प्रतिनिधी रोपटं लावलेल्या स्थळाला भेट देऊ शकता.
9) रोपट्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी.
10) या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्वांना डिजिटल प्रमाणपत्र व्हाट्स ऍप वर पाठविण्यात येईल.
11) या स्पर्धेसाठी कोणतीही फी नाही. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
12) अंतिम निकाल, विजेत्यांची नावे सोमवार 7 जून च्या शिक्षक ध्येय अंकात प्रसिद्ध होईल.
13) परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.
सेल्फी पाठविण्याचा अंतिम दिनांक 5 जून शनिवार सायंकाळी 5 वाजेपर्यंतच आहे.
या मोहिमेचा उद्देश झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणून प्रत्येक माणसाच्या मनात झाडं रुजवण्याचा असल्यामुळे या स्पर्धेत प्रत्येकाने – शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांनी – सहभाग नोंदवावा असे आवाहन मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या सावंत आणि शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!