
इगतपुरीनामा न्यूज, दि. १
५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५० प्रकारच्या विविध फळझाडांची लागवड करण्याचा उपक्रम देवळे उघडेवाडी येथे संपन्न झाला. अंबिका ऑटोमोबाईल व गुरुदत्त गॅरेज घोटीचे संचालक व सह्याद्रीनंदन सेवाभावी संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक नारायण दालभगत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा इतर व्यर्थ खर्च यामुळे सत्कारणी लागला आहे. आगामी काळातही असेच सामाजिक उपक्रम राबवून समाजाचे उत्तरदायित्व निभावणार असल्याचे नारायण दालभगत यांनी सांगितले.
नारायण दालभगत यांच्या परिवारातील सदस्य आणि मित्रांनी सोशल डिस्टन्स व सरकारी नियमांचे नियम पाळून हा उपक्रम पार पाडला. या कार्यक्रमाप्रसंगी शेणवड बुद्रुकचे माजी सरपंच कैलास कडू, संदीप केणे, महेंद्र कुवर, नितीन गटखळ, गणेश भागडे, ईश्वर दालभगत, रंगनाथ तोकडे, आदिनाथ तोकडे, राजु जमधडे आदींसह सह्याद्रीनंदन सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.