माझे गणराय

बालकवी : कु. पियुष चंद्रकांत गांगुर्डे, नाशिक

आज आहे
गणेश चतुर्थी
डोळे बंद करुनी स्मरुया
गणेशाची मुर्ती

मयुरेश्वर गणपती
गणेशमुनी एकदंत
वक्रतुंड भालचंद्र
स्मरा वाटली कशाची खंत

हाक मारा
येता दुःखाची वार्ता
हाच सुखकर्ता
हाच  दुःखहर्ता

आहेत महाराष्ट्रात
याचे अष्टविनायक
देवाधिदेव महादेवांचा
पुत्र तो गणनायक

मला झाला कोरोना
मी केली गणेश आराधना
गणरायाने ऐकली प्रार्थना
माझ्या तब्बेतीत
झाली आता सुधारणा

( बालकवी कु. पियुष चंद्रकांत गांगुर्डे हा जनता विद्यालय पवननगर नाशिक येथे शिकतो. कोरोना बाधित असतांना त्याने वरील कवितेची रचना केलेली आहे. )