भाजप नेते माजी आमदार शिवराम झोले यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

इगतपुरीनामा न्यूज, दि. 13

१० वर्ष इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे आमदार, १० वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्यपद आणि २५ वर्ष आदिवासी विकास महामंडळाच्या सत्तेत राहिलेले भाजप नेते माजी आमदार शिवराम झोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज पक्षप्रवेश झाला. अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या हस्ते त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला.
येत्या काही दिवसात इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज लोक पक्षाध्यक्ष शरदराव पवार यांच्या उपस्थितीत पक्षाप्रवेश करणार आहेत. इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांच्या पक्षप्रवेशाने मोठे पक्ष संघटन वाढेल असा दृढविश्वास पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके उपस्थित होते.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील दिग्गज असणारे माजी आमदार शिवराम झोले यांचे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. त्यांच्या माध्यमातून आधीच बळकट असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत झाला आहे. पक्षाची विचारधारा सर्वसमावेशक असल्याने आगामी काळात पक्षात अनेकजण येणार आहेत हे निश्चित आहे. 
- गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य शिरसाठे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!