इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाशिकचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना प्रवेश देऊन स्वागत केले. इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद गोरख बोडके, राष्ट्रवादीचे शिरसाठे गटप्रमुख पांडुरंग खातळे, तालुका उपाध्यक्ष त्रिंगलवाडीचे सरपंच अशोक पिंगळे यावेळी उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे जिल्हा परिषद गटातील अनेक माजी सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये धारगावचे सरपंच निवृत्ती पादिर, धार्णोलीचे सरपंच रमेश पथवे, पिंपळगाव भटाटाचे सरपंच बळवंत हिंदोळे, सांजेगावचे उपसरपंच योगेश काळे, वाकीचे उपसरपंच शिवनाथ काळे, रायांबेचे माजी सरपंच काशीनाथ भोर, वाकी ग्रामपंचायत सदस्य तानाजी कडाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की जे सरपंच, उपसरपंच यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर विश्वास टाकून ज्यांनी आज पक्षात प्रवेश केला त्यांचे स्वागत करतो. संबंधितांच्या गावात विकास कामासाठी निधी भरघोस दिला जाईल. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके म्हणाले की, आज तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेला पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करणारा असून आगामी निवडणुका यशस्वी करणारा आहे.