
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे भंडारदरा चौकात ४ ते ६ वर्षाचा एक मुलगा रडताना सापडला आहे. या मुलाबाबत अथवा त्याच्या पालकांबाबत कोणाला माहिती असल्यास घोटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घोटी बाजारपेठ येथे आज सकाळी 10 वाजता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी बघायला मिळाली. यावेळी रात्रपाळी करून घरी निघालेले घोटी पोलीस स्टेशनचे हवालदार लहामटे यांना ४ ते ६ वर्षाचा एक मुलगा रडताना आढळला. घोटीच्या भंडारदरा चौकात हा मुलगा रडताना दिसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी ह्या मुलाला घोटी पोलीस स्टेशन येथे नेऊन पोलीस स्टेशनच्या सुपूर्द केले.
ह्या ४ ते ६ वर्षीय मुलाला आपले नाव ही सांगता येत नसल्याने पालकांकडे सोपवता येत नाही. कोणाला मुलाबाबत अथवा त्याच्या पालकांबाबत माहिती असल्यास घोटी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.