इगतपुरी तालुक्यात रुग्णसंख्या होतेय कमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
इगतपुरी तालुक्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार फक्त १३५ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आज एकाच दिवशी तब्बल २९ कोरोना बाधित व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात फक्त १० व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेतल्यास इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होऊ शकतो असा विश्वास इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

 काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडयाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत.
- बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी

Leave a Reply

error: Content is protected !!