
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – गोंदे औद्योगिक वसाहतीतील सॅमसोनाईट कंपनीच्या कामगारांना नाशिकला घेऊन जाणाऱ्या बसला वाडीवऱ्हे जवळ अपघात झाला आहेत. तीन वाहनांचा हा अपघात आज साडेपाच वाजेच्या दरम्यान घडला. ह्या अपघातात बसमधील दहा ते बारा कामगार जखमी झाले असून काही कामगार गंभीर जखमी आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सुभाष निनाजी उंबरकर वय 47, पूजा वाळू कदम वय 27, मनोज गुलाब सोनवणे वय 26, प्रशांत रामचंद्र शिरसाठ वय 35, स्नेहकांत माधवराव कानडे 40, सुभाष दत्तात्रय सदगीर वय 37, रितेश कैलास त्रिभुवन वय 30 अशी जखमी कामगारांची नावे आहेत. काही नावे समजू शकली नाहीत.