नाशिप्र मंडळ आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेत टिटोली जिल्हा परिषद शाळेचे सुयश

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय Computalent Search Compititive 2023 या स्पर्धेत जिल्ह्यातुन एकमेव टिटोली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले. नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कुलमध्ये बक्षिस समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत जिल्ह्यातील ७८ शाळांच्या ४ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात टिटोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील तीनपैकी सर्व राऊंडमध्ये देवराज केणे, समर्थ राऊत या दोन विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातुन चांगले स्थान पटकावले. ह्या शाळेतील राज्य आदर्श शिक्षक सिध्दार्थ सपकाळे हे शाळेतील विद्यार्थ्यांनाही खऱ्या अर्थाने तंत्रस्नेही करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान रुजवून यश संपादन करणे खरे तंत्रस्नेही शिक्षकाचे काम आहे. यशस्वी विद्यार्थी, सर्व शिक्षकांचा अभिमान वाटतो असे कौतुक टिटोलीचे उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल भोपे यांनी केले. बक्षिस समारंभ विना माजगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच नाशिप्रचे अध्यक्ष राजेंद्र कलाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मुख्याध्यापिका मंगला शार्दुल, राजकुमार गुंजाळ, मंगला धोंडगे, प्रतिभा सोनवणे, स्नेहल शिवदे, रामदास गंभिरे आणि राज्य आदर्श शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!