उपाशीपोटी दरेवाडीचे चिमुकले विद्यार्थी पायपीट करीत निघाले इगतपुरीला : गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गिरवणार शाळेचे धडे : बेफिकीर प्रशासनाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा टाहो

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या काळूस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा बंद झाली आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी ही शाळा बंद केल्याने ग्रामस्थ सुद्धा संतापले आहेत. येथील पहिली ते चौथीचे चिमुरडे विद्यार्थी दरेवाडीपासून इगतपुरी पंचायत समितीमध्ये शाळा भरवण्यासाठी पायी निघाले आहेत. किमान हे अंतर 20 किमी असून उपाशीपोटी शाळा सुरु करण्याचे आंदोलन करण्यासाठी विद्यार्थी पायपीट करीत निघालेले आहेत. इगतपुरी तालुक्याच्या बेफिकीर शिक्षण प्रशासनाने शाळा बंद करण्याचा विचित्र निर्णय घेतल्याने ग्रामस्थ संतापलेले आहेत. दरम्यान काही शिक्षण विस्ताराधिकारी निव्वळ भटकण्यात पटाईत असून शाळांवर त्यांचे लक्ष नसल्याची तक्रार तालुक्यातील नागरिक करतात. विस्ताराधिकारी मनमानी करून शाळा बंद करण्याचे अहवाल देत असल्याने पिंप्री सदो येथे मुस्लिम बांधवांमध्ये संताप आहे. याबाबत शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची आजच भेट घेणार आहे. एका आदिवासी दुर्गम शाळेतील एक शिक्षक बोरटेंभे शाळेत वर्ग केल्याने आणि दुसरा शिक्षक येतच नसल्याने त्या आदिवासी वाडीतील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तेथील विद्यार्थी शिक्षणापासून दुर होत असल्याबाबत खात्रीशीर वृत्त असून लवकरच “इगतपुरीनामा” आवाज उठवणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!