इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरीच्या जवळ पिंप्री फाटा ते तळेगाव फाटा दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली आहे. पिंप्री फाटा या ठिकाणी कंटेनर बंद पडल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे समजते. यामुळे दीड किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामध्ये मोठी भर पडणार असल्याची शक्यता आहे. या ठिकाणी रस्त्यासह उड्डाणपूल, समृद्धी महामार्ग यांचे काम सुरु असल्याने आधीच वाहने कोंडीत सापडतात. त्यातल्या त्यात अवकाळी पावसाचे वातावरण आणि थोडा झालेला पाऊस यामुळे अधिक समस्या उभ्या आहेत. वाहनचालक लवकर जायच्या नादात कुठल्याही दिशेने वाहने चालवत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्व्हिस रोड वरून अवजड वाहने नेल्याने सर्व्हिस रोडवरही वाहतूक कोंडी झाल्याचे दिसते. महामार्ग पोलीस केंद्र घोटीचे कर्मचारी गेल्या दीड तासापासून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group