इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशावेळी महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांना जनता प्रतिसाद देत आहे. महाराष्ट्रात आपल्या वेगळ्या शैलीने कार्यरत असणाऱ्या छावा संघटनेकडून महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना सक्रिय जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला आहे. छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी स्वतः हिरामण खोसकर यांची भेट घेऊन पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील छावा संघटनेचे तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्ते हिरामण खोसकर यांच्या पाठीशी असून त्यांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी सक्रिय काम करतील असे यावेळी विलास पांगारकर यांनी म्ह्टले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group