इगतपुरीनामा न्यूज – भारत देशभरात आणि संपूर्ण राज्यात नावाजलेल्या आदर्श ग्रामपंचायत मोडाळे गावाची बदनामी करून नाहक चिखलफेक केली जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत व्यक्ती हे षडयंत्र करीत असून त्याच्या आरोपामध्ये तिळमात्र तथ्य नाही. गावासाठी घेतलेली रुग्णवाहीका घेण्यासाठी श्रीजी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ३ लाख आणि गोरख बोडके यांनी १ लाख रुपये आणि अन्य रक्कम मुंबईच्या एका दानशूर व्यक्तीने दिली. यामध्ये ग्रामपंचायतीचा किंवा ग्रामस्थांचा एकही रुपया घेतला नाही. गावातील लोकांना फायदा व्हावा म्हणून ही रुग्णवाहीका ग्रामपंचायतीच्या नावावर घेतलेली आहे. ग्रामपंचायत आर्थिक खर्च करण्याला सक्षम नसल्याने वाहक, इंधन, देखभाल दुरुस्ती आदी खर्च झेपणारा नाही. म्हणून ग्रामसभेत ठराव करून रुग्णवाहीका मोफत सेवेसाठी संबंधित हॉस्पिटलच्या ताब्यात दिली. या हॉस्पिटलद्वारे आणि रुग्णवाहिकेद्वारे आजही मोडाळे गावाला मोफतच सेवा देत आहोत. याबाबत कोणीही खात्री करायला जाऊ शकतात. राजकीय वचपा काढण्यासाठी विनाकारण खोटे आरोप केले जात आहे. यापुढे मोडाळे गावाबाबत आणि रुग्णवाहिकेबाबत खोटे आरोप केल्यास संबंधित व्यक्तीला न्यायालयात खेचून धडा शिकवू असा घणाघात मोडाळेच्या सरपंच शिल्पा आहेर यांनी बोलतांना केला.
Related Posts
कन्येच्या विवाहात मानपानाऐवजी रोपवाटिकांचे वाटप : गिळंदे दांपत्याच्या आदर्श उपक्रमाचे इगतपुरी तालुक्यात कौतुक
इगतपुरीनामा न्यूज, दि. २ लग्न म्हटले की टॉवेल, टोपी, लुगडे, साड्या, फेटे यासारख्या प्रथा खिशाला रिकामे करुन कर्जबाजारी बनवतात. यामध्ये…
नवनाथ भक्तीसार : अध्याय १५
श्रीगणेशाय नमःजयजयाजी जगत्पालका ॥ मुनिमानसचकोरमृगांका ॥ कृपांबुदातया पूर्णशशांका ॥ ग्रंथादरीं येई कां ॥१॥मागील अध्यायीं कथन ॥ तुवां वदविलें कृपा करुन…
राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन : जागतिक महिला दिनी होणार निकाल जाहीर
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – ‘शिक्षक ध्येय’ महाराष्ट्र आणि ‘मातृसेवा फाउंडेशन’ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी…