संकटात साथ देणाऱ्या भूषण जाधव यांना प्रभाग ४ मधून निवडून देण्याचे निश्चित 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – कोरोनाचा काळ म्हटला की आजही डोळ्यांपुढे उभे राहते ती भीती, अंधार आणि अनिश्चिततेचं राज्य… परिस्थितीच अशी होती की लोक आपल्या घरात शब्दशः कैद झाले होते.. बाहेर फक्त रुग्णवाहिका, हॉस्पिटलचे सायरन यांचेच आवाज ऐकू येत.. त्यातून जनतेच्या समोर ठाकले होते ते फक्त मृत्यूचे भय… त्या काळात प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्यात व्यस्त होता; पण काही दुर्मीळ जीव असेही होते, जे इतरांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे सरसावले. त्यांच्यापैकीच इगतपुरीतील एक तेजस्वी नाव म्हणजे भूषण प्रभाकर जाधव…! प्रभाग ४ मधून हा देवदूत निवडणुकीत विजयी होण्यासाठी उभा आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या मशाल चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. त्या काळात इगतपुरी शहरात अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. प्राणघातक संसर्ग, सगळीकडे गर्दीने भरलेली हॉस्पिटल्स, औषधांची टंचाई आणि भयाची दाट धुकं – अशा भयंकर नकारात्मक प्रसंगी हतबल नागरिकांनी भूषण जाधव यांना हतबलतेने सांगितलं “भूषणदादा, काहीच मार्ग नाही… मदत कर!” त्या एका शब्दानंतर जे घडलं, ते आजही इगतपुरीकर विसरलेले नाहीत.  संपूर्ण परिसरात ‘दूर रहा, वावरू नका’ अशी परिस्थिती असताना ते स्वतः औषधांच्या पाकिटासह कोरोनाग्रस्त लोकांच्या दारात उभे राहिले.. यावेळी भूषण जाधव यांच्या हाती आशेची औषधे दिसत असली तरी त्या पलीकडे हृदयात माणुसकीची ऊब जाणवत होती. हा तो प्रसंग होता की त्या क्षणी भीती हरवली, आणि इगतपुरीकरांचा विश्वास जागा झाला. आवश्यक कोरोना प्रतिबंधक औषधे, जीवनसत्वं आणि सल्ला मिळाला. भूषण जाधव यांच्या शब्दांमध्ये धीराची शक्ती आणि सेवाभावाची पवित्रता असल्याने अनेकांना प्रकृती सुधारत पुन्हा जीवनाचा श्वास घेता आला. भूषण जाधव म्हणतात की, “त्या काळात सगळे मागे हटले होते. पण लोकांच्या हृदयात असलेला ईश्वर मला खुणावत होता. माझ्या हातून लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्या ईश्वराने योजना केली होती. हा प्रसंग केवळ एका व्यक्तीच्या मदतीचा नाही, तर ‘नेतृत्व म्हणजे काय असतं’ याचं सजीव उदाहरण आहे. भूषण जाधव यांनी त्या कठीण काळात अनेक गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवला. कोठे औषधे, कोठे अन्नधान्य, तर कोठे फक्त धीराचे शब्द देत त्यांनी सामाजिक भान जपले. त्यांच्या कार्यात कोणताही गाजावाजा नव्हता. तर शांत समर्पण आणि अंतःकरणातून आलेली जबाबदारी यांची सांगड होती. आज इगतपुरी प्रभाग ४ मध्ये भूषण जाधव यांच्या उमेदवारीचा उल्लेख होतो, तेव्हा लोक केवळ विकासाची नव्हे, तर मानवतेची आठवण काढतात. कारण “जो संकटात साथ देतो, त्याच्यावरच विश्वास ठेवावा” हे लोकांना ठाऊक आहे. भूषण जाधव यांची उमेदवारी म्हणजे अनुभवाचा प्रकाश, संवेदनशीलतेचा स्पर्श आणि लोकसेवेचा जिवंत पुरावा म्हणता येईल. उमेदवारी केवळ मतांची नाही, तर मनांची जिंकणारी आहे. कारण त्यात राजकारण नव्हे, तर मानवतेचा आत्मा जिवंत आहे.

error: Content is protected !!