
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला तर थंडीचा पारा घसरतो आहे. मात्र राजकीय चर्चांची गरमाई वाढत चालली आहे. इगतपुरी शहर विकासाच्या मागण्यांपासून ते प्रशासन स्तरावर कामकाज पूर्ण करून घेण्याची कोणत्या उमेदवारांची कार्यकुशलता आहे? परिसरात झालेली आणि न झालेली कामे, समस्या असे अनेक विषय सध्या शेकोटी भोवती चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य विजयी होणाऱ्या नावांबाबत अंदाज, चर्चा आणि विश्लेषण याबाबत देखील अनेकानेक मते ऐकायला मिळत आहेत. शहरातील पायाभूत सुविधा, शासकीय कार्यालये आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांतील बदलत्या परिस्थितीमुळे नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षांमध्येही गेल्या काही वर्षांत लक्षणीय बदल झाला आहे. त्यामुळे पुढील काळात कोणते नेतृत्व शहराला पाहिजे, याबाबत आता पासूनच जनतेने चर्चा सुरू केली आहे. याच एकूण वातावरणात इगतपुरी शहरात नगराध्यक्ष पदासाठी सौ. शालिनीताई संजय खातळे हे नाव चर्चांमध्ये सर्वाधिक आघाडीवर असलेले दिसते. शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी घेऊन त्या थेट नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत. त्यांच्यासह संपूर्ण खातळे कुटुंबाच्या कार्यशैलीचा, कर्तृत्वाचा आणि सार्वजनिक व्यवहारातील सातत्याचा मागोवा घेता मतदारांना त्या भावल्या आहेत. त्यांच्या रूपाने इगतपुरीला विकास करणाऱ्या स्थिर व शांत नेतृत्वाची गरज असल्याचे मतदार सांगतात. यासह इगतपुरीतील रखडलेल्या राममंदिराचे काम शालिनीताई खातळे ह्याच पूर्ण करतील असा लोकांचा कयास आहे. प्रशासकीय कामकाजाची जवळून ओळख, स्थानिक पातळीवर सहभाग, आणि गरजेच्या प्रश्नांवर वेळेवर प्रतिसाद देण्याची सवय ही काही वैशिष्ट्ये त्यांच्याबाबत नोंदवली जातात. या निवडणुकीला यावेळी तेज प्राप्त झालेलं दिसतं. यामध्ये सौ. शालिनी खातळे यांची प्रतिमा, कामाची शैली आणि सर्वांना न्याय देण्याची क्षमता या तीन गोष्टी महत्त्वाच्या मानल्या गेल्या. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या खातळे कुटुंबातील शालिनी खातळे यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. एक जेष्ठ महिला मतदार सांगते की, निरपेक्ष वागणूक, शांत स्वभाव आणि वादापेक्षा कामाला प्राधान्य या गुणांमुळे शालिनी संजय खातळे यांची उमेदवारी महत्वाची आहे. म्हणूनच २ डिसेंबरला मतदानातून परिवर्तन घडणारच असा सुर व्यक्त होतोय.