आदिवासी गौरव दिन : घोटी येथील सिन्नर फाट्यापासून विशाल रॅलीत विविध आदिवासी वेशभूषा आणि आदिवासी कलाकारीचा आविष्कार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

जागतिक आदिवासी दिनानिमित्त घोटी येथील सिन्नर फाटा ते राजाराम साळवी मंगल कार्यालयापर्यंत विशाल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडण्यासाठी विविध आदिवासी वेशभूषा, मोरगा नाच, बोहडा नृत्य, कांबड नाच नृत्य सादर करण्यात आले. आदिवासी वेशभूषा करून महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

आदिवासी बांधवांनी विविध वेशभूषा केल्या. यामध्ये राया ठाकर राजू पारधी ( कसारा ), राघोजी भांगरे रमेश भले ( त्रिंगलवाडी ), बिरसा मुंडा अर्जुन भले, मोरगा पथक आवळखेड, शिवाचीवाडी, त्रिंगलवाडी, बोहडा नृत्य मुंढेगाव, कांबड नृत्य आवळखेड यांनी सादर करून मन जिंकले. यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, मंगाजी खडके ठाकूर समाज जिल्हा, मंजुळा भले अध्यक्ष महिला जिल्हा संघटक, संजय लोते, ॲड. निवृत्ती कातोरे, विठ्ठल आघाण, मदन भगत, देवराम धोबी, ज्ञानेश्वर गांगड, विठ्ठल पदमेरे, अंकुश गांडाळ, तानाजी आघाण, बाळू ठोंबरे, विष्णू कामडी, सावन कातोरे, आनंदा खडके, अशोक शिद, काळूबाबा शिद ,भीमा हंबीर, शांताराम पादिर, यशवंत उघडे, जयराम आगिवले, बबन भले, अंकुश गांडाळ, एकनाथ झुगरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन ॲड. मारुती आघाण ठाकूर समाज तालुका सचिव, डॉ. जगन ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते, अशोक पिंगळे सरपंच त्रिंगलवाडी, ज्ञानेश्वर उघडे देवळे सरपंच, हरी भले सामाजिक कार्यकर्ते, निवृत्ती आगिवले, सुगंधा हंबीर आडवण सरपंच, बळवंत हिंदोळे सरपंच, रमेश पथवे धार्णोली सरपंच, निवृत्ती पादिर धारगाव सरपंच, रतन लोते मालुंजे सरपंच, भीमा हंबीर मुंढेगाव सरपंच, शंकर पादिर ग्रामपंचायत सदस्य, बाळू भले सामाजिक कार्यकर्ते, कृष्णा केवारी आवळखेड सरपंच, मंगेश खडके चिंचलेखैरे सरपंच आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत गिरे व देविदास हिंदोळे यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!