शेतकरी विकास पॅनलचे सर्व १८ उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार – रमेश सदाशिव जाधव : मतदारांचा वाढता पाठिंबा आणि प्रचारात घेतली आघाडी

इगतपुरीनामा न्यूज – लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांचे खंदे समर्थक असणारे रमेश सदाशिव जाधव घोटी बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी गटातून उमेदवारी करीत आहे. शेतकरी विकास पॅनलतर्फे त्यांची उमेदवारी असून मतदानासाठी कपबशी ही निशाणी आहे. बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारात लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलने आघाडी घेतली आहे. पॅनलचे सर्व १८ उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारातून आपली भूमिका मतदार ग्रामस्थांपर्यंत पोहचवत आहेत. दांडगा जनसंपर्क असणारे रमेश जाधव हे इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष आहेत. जिल्हा बँकेची शाखा, गोंदे विविध कार्यकारी सोसायटी त्यांच्या प्रयत्नांनी सुरु झालेली आहे. गोंदे दुमाला येथील सरपंच पदावर असताना त्यांनी राबवलेला फिल्टर प्लांट जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. गावातील रस्ते काँक्रीटसह अनेक विकासाची कामे त्यांनी केली आहेत.

मुकणे धरणातील पाण्याचा २४ तास पाणीपुरवठा गावाला होतो आहे. गोविंदराव आदिक, बाळासाहेब थोरात यांच्याकडे  सतत पाठपुरावा करून अनेक बंधारे झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा झाला. बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ॲड. संदीप गुळवे यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने यांच्या माध्यमातून मार्केट कमिटीची सुधारणा, आंतरराष्ट्रीय दर्जासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे ते म्हणाले. स्व. दादासाहेबांच्या आशीर्वादाने शेतकरी विकास पॅनल निवडून येणार असून यापुढेही दादांच्या आशीर्वादाने चांगले कार्य सुरू राहील असेही त्यांनी सांगितले. येत्या २८ तारखेला कपबशी निशाणीवर ठसा मारून शेतकरी विकास पॅनलला प्रचंड विजयी करा असे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!