
इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत कुऱ्हेगाव येथे काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल झाली होती. त्याबाबत वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन गु. र. न. 209/2025 बीएनएसएस कलम 325,271,3(5) व भा. ह. का. कलम 4/25 व महा. प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे 5 (क)9(अ ) प्रमाणे गुन्हा दाखल होता. जागेवर प्रत्यक्षात जनावरे कापण्याचे काम करणारा मुख्य आरोपी सुफीयान हुशेन कुरेशी ( शेख ), वय 23 रा. भिवंडी, निजामपूर, जि.ठाणे हा दोन महिन्यापासून फरार होता. ह्या प्रकाराबाबत स्थानिक लोकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता. ह्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग होताच तपासाचे चक्र फिरले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ह्या आरोपीचा शोध घेतला असता तो भिवंडी परिसरात मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हर्षल भोळे, पोलीस हवालदार प्रविण काकड, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांनी ही कामगिरी केली आहे.