ग्रामीण खेळाडूंच्या क्षमतांचा विकास झाल्यास उदयोन्मुख खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील – अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले : जागरूकता फाउंडेशनची भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये विविध प्रकारच्या क्षमता असतात. खेळाडूंच्या क्षमतांचा विकास झाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष नैपुण्य दाखवता येऊ शकते. इगतपुरी येथील जागरूकता फाउंडेशन आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक उदयोन्मुख खेळाडू असल्याचे मी समजते. माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून मी होतकरू गरीब आणि गुणवंत खेळाडूला दत्तक घेत आहे. मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने यशवंत खेळाडूंची फौज निर्मित होईल असे प्रतिपादन प्रख्यात सिने अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी केले इगतपुरी येथील जागरूकता फाउंडेशन आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.

दीपाली सय्यद भोसले पुढे म्हणाल्या की, योग्य संधी मिळाल्यास ग्रामीण खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्वल करू शकतो. त्यासाठी माझ्या फाउंडेशनच्या वतीने आवश्यक ते साहाय्य केले जाईल. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, आदिवासी विकास विभागाचा माध्यमातुन खेळाडूंना मदत उभी करण्यासाठी बांधील आहे. यातून देशाला नैपुण्यदायी खेळाडू मिळू शकतील. यावेळी काँग्रेस नेते संदीप गुळवे यांनीही मार्गदर्शन केले.
आज सकाळी पिंप्री फाट्यावर जागरूकता फाउंडेशनच्या मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन प्रख्यात सिने अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, प्रशांत कडू आदींच्या हस्ते झाले. यानंतर विविध गटातील खेळाडूंसाठी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील शेकडो स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.

पारितोषिक वितरणप्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, काँग्रेस नेते संदीप गुळवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, पिके बिल्डर्सचे अध्यक्ष प्रशांत कडू, धीरज डेव्हलपर्सचे संजय खातळे, विनायक पाटील, अली शेख, दत्ता कपिले, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, गोंदे दुमालाचे सरपंच शरद सोनवणे, शशिकांत बर्वे, उत्तमराव शिंदे, अमित रोहमारे, विक्रम मनोहर, डॉ. प्रदीप बागल, हरिश्चंद्र नाठे, सुरेंद्र गायकवाड, अर्जुन भटाटे उत्तमराव शिंदे, अमित रोहमारे, विक्रम मनोहर, डॉ. प्रदीप बागल, हरिश्चंद्र नाठे, किरण फलटणकर, हरिष चौबे, आदी उपस्थित होते. जागरूकता फाउंडेशन अध्यक्ष भाऊराव भागडे, उपाध्यक्ष सुनील पंडित, कार्याध्यक्ष शरद सोनवणे, सचिव गणेश कडू, सहसचिव आनंद जाधव, सदस्य रवी पंडित, अर्जुन देहाडे, विश्वनाथ पंडित, सुरेंद्र गायकवाड अर्जुन भटाटे आदींनी मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!