घोटीजवळ खासगी बसला मागून येणाऱ्या टँकरने दिली धडक : २ जण जखमी ; वाहतूक एकेरी मार्गाने सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जात असताना घोटीजवळ उभ्या असलेलता खाजगी बसला पाठीमागून येणाऱ्या टँकरने धडक दिली. या अपघातात टँकर चालकाचे पाय कॅबिनमध्ये अडकल्याने तो टँकरमध्ये अडकला. त्याला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. यामध्ये आणखी एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली.

MP 41 P 3330 ही खाजगी बस महामार्गावर उभी असताना पाठीमागून आलेला टँकर क्रमांक MH 12 QG 0096 ने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे हा अपघात झाला. रूट पेट्रोलिंग टीमचे कर्मचारी रवि देहाडे, सुरज आव्हाड, राजू उघडे, राहुल पुरोहित, डायमंड पराड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलीस पवार, माळदे यांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर नाशिक मुंबई महामार्गाची वाहतूक एकेरी मार्गाने सुरू असून अपघात ग्रस्त वाहन बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!