बाळासाहेबांच्या विचारांचे रक्त अंगात भिनलेले निष्ठावान व्यक्तिमत्व
लेखन : देवचंद महाले
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील उपेक्षित व वंचित आदिवासी गोरगरिबांसाठी काम करणारे आभाळाएव्हढे व्यक्तिमत्व म्हणजे समाधान बोडके पाटील. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला असलेले वजन आणि लोकसंबंधांचा व्याप पाहता हा माणूस किमयागार आहे असे सिद्ध होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाईक आणि कणखर बाण्याचा धाडशी गडी म्हणून ओळखले जाणारे समाधान बोडके पाटील म्हणजे गोरगरिबांचा पंचप्राण आहे. आपल्या सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक आणि सेवा कार्याने परिचित असणाऱ्या ह्या ढाण्या वाघाचा आज वाढदिवस.
इगतपुरी, तळेगाव अंजनेरी, त्र्यंबकेश्वर येथून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वृत्तपत्र वाटप करतांना समाधान बोडके पाटील यांनी आपली लेखणी पत्रकारितेसाठी हाती घेतली. समाजाच्या विविध प्रश्नांना हात घालून, आपल्या लेखणीने अनेक समस्या त्यांनी सहज सोडवल्या. आपल्या भागातील सामान्य नागरिकांचे आशास्थान ते बनले. ह्या काळातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी ते प्रचंड प्रभावित झाले. बालवयातच शिवसेनेचे निवृत्ती पाटील जाधव, मनोहर मेढे पाटील यांच्या संपर्कात हा उमदा तरुण आला. आपल्या शैलीने शाखाप्रमुख ते थेट भारतीय विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अशी बढती त्यांनी मिळवली.
ह्या बहरत्या काळात शिवसेनेचे तत्कालीन आमदार पांडुरंग गांगड, काशीनाथ मेंगाळ यांच्याकडून त्र्यंबकेश्वर तालुक्यात अभूतपूर्व विकासाचा पर्वत त्यांनी उभा करून दाखवला. यासोबतच पंचायत राज, सहकार, यातून आपल्या राजकारणातील कुशलता दाखवायला सुरवात केली. हळूहळू समाधान बोडके पाटील यांच्यातील मुत्सद्दीपणा जनसेवेसाठी तत्परतेने पुढे आला. शिवसेनेचे मोजके वक्ते उपस्थितांना आपल्या अमोघ वक्तृत्वाने मोहित करतात. त्यामध्ये समाधान बोडके पाटील यांचा क्रमांक अव्वलस्थानी आहे. त्यामुळे आपल्या शैलीदार प्रभावी भाषणातून त्यांनी अनेकांची मने जिंकली. कौशल्यपूर्ण संभाषणातून अनेक समस्यांची सोडवणूक करून घेतली.
वयाच्या अवघा २१ व्या वर्षी वेळूंजे गावचे सरपंच झाल्यानंतर ग्रामविकासाच्या दृष्टीने तालुक्यात आपल्या गावाची वेगळी ओळख निर्मित केली. युवकांना रोजगार, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, गावातील नळ पाणीपुरवठा योजना, अंतर्गत सिमेंट रस्ते, हायमास्ट, पाणवठे, प्रत्येक वार्डात समाज मंदिर, ग्राम सचिवालय, विद्युतीकरण, गावची आदर्शवत स्मशानभूमी , शिवार रस्ते, ग्रामपंचायत अंतर्गत हेदअंबा, बोरीचीवाडी हागोटे वस्ती, कानडी वस्ती आदी ठिकाणी विद्युतीकरण केले. प्रत्येक वस्तीत वस्ती वस्तीशाळा, अंगणवाडी मंजूर करून आरोग्य उपकेंद्र, गावातील उपेक्षित वंचित घटकातील लाभार्थी यांना घरकुले, विहीरी यांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून योजना राबवून विकासामध्ये वेळुंजे गावाला विकसित करून ठेवले आहे.
गरजु गोरगरीब रुग्णांना स्वतःची गाडी मोफत देऊन रुग्णसेवा करणे, कोरोना काळात आदिवासी ग्रामीण भागात गोरगरिबांना किराणा व जीवनावश्यक वस्तू वाटप, अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था, तालुक्यातील पाणी प्रश्न, रस्ते, आरोग्य, शिक्षण, कुपोषण दूर करणे आदी सेवाभावी कामे त्यांनी केली. ह्या कामांमध्ये समाधान बोडके यांचा मोठा हातखंडा असून आपल्या दूरदृष्टी व कौशल्यदायी नियोजनाने ते त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लोकांच्या मनात अधिराज्य गाजवतात.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी झपाटलेले समाधान बोडके पाटील यांचे शिवसेनेत नेहमीच कौतुक होत असते. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना आदर्श राजकीय युवानेता, समाजभूषण, रूग्णसेवक, रूग्णमित्र असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. संपूर्ण तालुक्यात त्यांना नेहमीच लोकांकडून सन्मान दिला जातो. अत्यल्प वयात त्र्यंबकेश्वर तालुक्यात अभ्यासू, संवेदना जपणारं व्यक्तिमत्व, सेवेच्या व्रताला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. समाजाच्या सेवेसाठी राजकारण व यशस्वी व्यावसायिक म्हणून त्याची ओळख असली तरी गोरगरीबांसाठी तत्परतेने सेवा आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा आदर्श नेता म्हणूनही ते परिचित आहेत.
तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीवर लहानथोर नागरिक, जिल्ह्यासह राज्यभर राजकीय, सामाजिक, उद्योग, व्यावसायिक आदी सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांसोबत त्यांचे स्नेहानुबंध आहेत. जाईल तिथे माणसं मित्र जोडणारा हा अवलिया जनसंपर्कात सर्वोच्च स्थानावरील ध्येयवेडा शिवसैनिक आहे. त्यांनी अनेक युवकांना राजकारण, समाजकारण आणि उद्योग व्यवसायात मार्गदर्शन करून घडवले आहे. त्यांनी त्र्यंबक, हरसूल रस्त्यावर उभे केलेले प्रसिद्ध हॉटेल टायगर व्हॅली पर्यटकांना आपल्या रूचीदार आणि अस्सल मराठमोळ्या जेवणाने कायमच आकर्षित करीत असते.
निष्ठावंत शिवसैनिक, दिलदार सखा, अभ्यासू नेता, विकासाचा प्रणेता आणि कणखर वक्तृत्व करणारा ढाण्या वाघ समाधान बोडके पाटील यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा..!