
नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी सुप्रसिध्द कवियत्री सुनिता वाळुंज यांची तर महिला नाशिक जिल्हाध्यक्षपदी आरती सोनवणे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी केली आहे. हभप सुनिता विजय वाळुंज या राष्ट्रीय भागवत धर्म परिषद सिन्नर तालुका महिलाध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत. कवयित्री म्हणुन त्यांना साहित्याचे ३७ पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांना नुकताच दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात सावित्रीबाई फुले नॅशनल एक्सलन्स लेडी अवार्ड मिळाला आहे. रामकमल लॉन्स त्या संचालिका व समाजसेविका आहेत. आरती सोनवणे या परिषदेत सक्रिय असुन शिक्षिका व कवयित्री म्हणुन त्या प्रसिद्ध आहेत. दोघींच्या निवडीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्यासह परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी देविदास खडताळे, फुलचंद नागटिळक, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर, अमोल कुंभार, माणिकराव गोडसे, बाळासाहेब गिरी, रवींद्र पाटील, विद्या पाटील, प्रदीप पाटील, योगेश जोशी, राजु आतकरी, श्रीराम तोकडे, संजय कान्हव, रमेश मुकणे, देविदास शिरसाट, पुनम राखेचा, बाबासाहेब थोरात, रोहिणी चौधरी, प्रांजल कोकणे यांनी स्वागत केले आहे.