इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
इगतपुरी तालुक्यासाठी आज मोठा दिलासा देणारा दिवस आहे. आज प्रथमच एकाच दिवशी तब्बल ४५ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळवला. हे व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दुसरी बातमी सुद्धा दिलासा देणारी असून आज फक्त १० जणांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार २८६ कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आपल्या हक्काची कोविड -19 प्रतिबंधक लस न घाबरता बिनधास्त लस घ्यावी.
नाशिक शहरातील लोक हरसूल आणि ग्रामीण भागात काम धंदे सोडून लस घ्यायला येत आहे. आपण सर्व ग्रामीण भागातील जागरूक नागरिक आहोत. आपण आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावी, मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना लस घेण्यासाठी सांगावे.
– मिथुन पांडुरंग राऊत, शिवसेना नेते हरसूल
बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी प्रभावी
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008