
इगतपुरीनामा न्यूज – माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र अपक्ष उमेदवार युवानेते बाळासाहेब झोले यांच्या प्रचारार्थ आज सोमवारी १८ नोव्हेंबरला घोटी येथील राजाराम साळवी मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजता समन्वय सभा होणार आहे. ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सभेसाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार शिवराम झोले यांना मानणारा वर्ग दोन्ही तालुक्यात असून या सभेसाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे. बाळासाहेब झोले यांचा गाव तिथे मोठा कार्यकर्ता असून त्यांचा गावोगावी प्रचार दौरा सुरू आहे. प्रत्येक गावात बाळासाहेब झोले यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेच्या निवडणुकीत बाळासाहेब झोले यांची निशाणी ऑटो रिक्षा लक्ष्यवेधी ठरत आहे.