इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी तालुक्यातील अतिशय जागरूक आणि महत्वपूर्ण असणाऱ्या घोटी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चंद्रभान विष्णू फोकणे आणि व्हॉइस चेअरमनपदी शिवाजी सिताराम मोंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संपूर्ण गावाची बैठक घेऊन पदाधिकारी निवड बिनविरोध करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. घोटी खुर्द गावाने एकी दाखवून यापूर्वी संचालक मंडळाची निवडणुक सुद्धा बिनविरोध केल्याने इगतपुरी तालुक्यात गावकऱ्यांचे कौतुक झाले होते. ही बिनविरोध प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिवाजी फोकणे, बाळासाहेब खातळे, आत्माराम फोकणे, संतोष फोकणे, ज्ञानेश्वर भोईर, संपत रोंगटे, कैलास कोकणे, किसन दादा रोंगटे आदींचे मार्गदर्शन लाभले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शशांक पगार यांनी काम पाहिले.
चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन निवडीच्या बैठकीप्रसंगी संचालक आत्माराम ज्ञानेश्वर फोकणे, संतोष निवृत्ती कोकणे, अशोक शंकर पंडित, ईश्वर रंगनाथ रोंगटे, रमेश किसन निसरड, बळीराम सीताराम रोंगटे, कचरू बाबुराव फोकणे, उमाजी विठोबा रोंगटे, द्रौपदाबाई बाळासाहेब खातळे, विमलबाई रामचंद्र फोकणे, लालू कारभारी बिन्नर उपस्थित होते. सर्वांना सोबत घेऊन सोसायटी आणि गाव पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करू असा विश्वास नूतन पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिला.