कोरोनाशी सामना करतांना..! भाग २

कोरोना आजाराच्या पायऱ्या, अवस्था, सतर्कता, काळजी, लक्षणे, टेस्टस, उपचार पद्धती, अनुभव, मार्गदर्शन आदी विषयांवर आपल्या सर्वांना अत्यंत अनुभवी माहिती आणि मार्गदर्शन करताहेत घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश कि. गोरे…! भाग २

मार्गदर्शक : डॉ. अविनाश कि. गोरे
वैद्यकीय अधिकारी, ( बालरोगतज्ञ )
ग्रामीण रुग्णालय, घोटी
ता.इगतपुरी, जि. नाशिक
संपर्क : ७९७२४२६५८५

नव्या वाचकांसाठी भाग १ ची लिंक https://igatpurinama.in/archives/1636

■ कोरोना झालेल्या जवळजवळ ८५ टक्के लोकांना खूपच साधी, सौम्य लक्षणे आढळून येतात. पण हेच लोक सभोवताली फिरून, इकडे-तिकडे मनमुरादपणे बागडून डिसीज स्प्रेड/आजाराचा प्रसार करण्यात असमर्थांनार्थ अशी नकारात्मक भूमिका बजावतात. अशा लोकांनी स्वतःला एक जागी बांधून ठेवणे गरजेचं असतं. अथवा स्वतःचे विलगिकरण करून घेणे आवश्यक असते. त्यांच्यामुळेच मी तर म्हणेन हा आजार फोफावला असावा. त्यांनी जर वेळीच हे समजून घेतले असते तर हा आजाराचा प्रसार रोखण्यास नक्कीच मदत झाली असती. ह्या लोकांनी केवळ जशी लक्षणे तशी ट्रीटमेंट घेतली तरी ते निभावू शकते. क्वचितच ह्यांना बाकीचे कोव्हीड प्रोटोकॉल्सनुसार आमचे डॉक्टर गरजेनुसार ट्रीटमेंट देऊ शकतात. येथे नवीन गाईडलाईन्स नुसार जर काही ठराविक ड्रगची वाफ तुम्ही नेब्युलायजरने अथवा MDI ( Metered Dose Inhaler )ने अशा किरकोळ-मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या पेशन्ट्स लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने जर दिली तर चांगला इफेक्ट येण्याची शक्यता असते.
■ १० टक्के लोकांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आढळून येऊ शकतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्यांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार डॉक्टर ट्रीटमेंट सुरू करत असतात. त्यामध्ये तुम्ही ऐकलेल्या सगळ्या इंजेक्शनचा समावेश असू शकतो. त्यांत  Steroids, Anticoagulants आणि ऑक्सिजन, इंजेक्शन रेमडेसीविर पण देऊ शकतात. ह्यामध्ये ज्यांना पूर्वीचा फुफ्फुसांचा आजार आहे, सोबत बीपी, शुगर, लठ्ठपणा, किडनी विकार, कॅन्सर,व ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती काही औषधांनी कमी झाली आहे उदा. स्टिरॉइड्स वगैरे आदी अशा पेशन्ट्सकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. ह्यांना ऑक्सिजन लागण्याची शक्यता पण जास्त असते.

■ राहिले ते ५ टक्के हे लोक गंभीर लक्षणे घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावीच लागतात. ह्यांचा आजार हा बळावलेला  असतो. ह्यांना आयसीयूची गरज भासू शकते. ह्यांचे वय जास्त असू शकतात. जुने आजार असू शकतात. त्यांची बाकीची इंद्रिये वयोमानानुसार कमकुवत झालेली असू शकतात. ह्यांना Close Monitoring लागत असते. जी आजघडीला सगळ्या कोरोनाच्या DCHC लेव्हलच्या हॉस्पिटलमध्ये होऊ शकते. ह्यांना कोरोनाचा धोका जास्त असतो. ह्यांना कोव्हीड प्रोटोकॉल्सनुसार जी औषधी Recommended आहेत ती दिली जातात. कुठले औषधी द्यायची ही त्या त्या वेळी त्या त्या डॉक्टरांनी घ्यायचा निर्णय असतो. ह्यावेळी तुमचं अगदी सुरुवातीला जर निदान झाले असेल तर Convalescent Plasma Treatment, स्टिरॉइड्स, इंजेक्शन Remdesivir, इंजेक्शन tocilizumab ( Inj Toci ) ऑक्सिजन-काही लिटर/मिनिट,हे सर्व आलं. त्यापुढे हाय फ्लो नॅजल ऑक्सिजन ( HFNO ), Non-Invasive-Ventilation ( NIV ), Bi-Pap Machine, Oxygen Concentrator ह्या ऑक्सिजन देण्याच्या मशीन आल्या. ह्यापुढे पेशन्ट्स लोकांना अत्यवस्थ पेशन्ट्ला वाचविणे जिकरीचे असते. त्यात एक अजून मेडिकल अडचणींचा विषय म्हणजे ( ARDS )
Acute Respiratory Distress Syndrome, तिथून पेशन्ट् वाचवणे खरोखरच कठीण काम असते. ह्यामध्ये वरील सगळ्याच गोष्टी पेशन्ट्सला वाचविण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यांत  हॉस्पिटलचे सेट अप, पेशन्ट्सचा स्वतःचा पण रिस्पॉन्स आवश्यक असते.

ही फक्त माहिती आहे. ह्यामध्ये स्वतःचे तर्कवितर्क लावून उगाच डॉक्टरांच्या उपचारावर अविश्वास दाखवू नये. तसा प्रयत्न कुणी पण करू नये. कारण ह्यावेळेसची मॅनेजमेंट ही खूप क्लिष्ट असते. ती आम्ही डॉक्टरांनी केलेली आणि त्याबद्दलचा विचार पण आम्हीच केलेला बरा ! ( पुढील भाग उद्या दि. ३ मे २०२१ ला प्रकाशित होईल. )

टीप : वरील लेख हा मी केवळ आणि केवळ माझ्या आतापर्यंतच्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारे लिहिला आहे. ह्यामध्ये बऱ्याच अर्थी शास्त्रीय दृष्टिकोन आहे. कुणाची पण भावना दुखवायचा हेतू नाहीये. डॉक्टर्स आणि नॉन -मेडिकोज ह्या दोहोंसाठी पण आहे. सामान्य जनतेच्या मनातील संभ्रम दूर करणे. त्यांना आजाराची, उपचाराची थोडी विस्तृत माहिती देणे, कुठे काय पावलं उचलायची, डॉक्टरांचे मनोबल, कार्यक्षमता उंचावणे हाच उद्देश आहे. लेखावर कमेंट करून तुम्ही तुमची शंका माझ्या ब्लॉगवर, फेसबुकवर, ह्या पोर्टलवर विचारू शकता.
डॉ. अविनाश कि. गोरे

Similar Posts

Comments

Leave a Reply

error: Content is protected !!