पिंपळगाव घाडगा भागातील विवाहित महिला बेपत्ता

इगतपुरीनामा न्यूज, दि. २
इगतपुरी तालुक्यातील भारतेवाडी पिंपळगाव घाडगा येथील ३१ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. तिच्या पतीने याबाबतची फिर्याद वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दिली आहे. ह्या महिलेच्या शोधाबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत कोणत्याही नागरिकांना काही माहिती असल्यास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे अथवा जवळच्या कोणत्याही पोलीस ठाण्याला कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील भारतेवाडी पिंपळगाव घाडगा येथे दौलत दामु कुंदे वय – ३५ वर्ष, धंदा फळविक्री हे परिवारासह राहतात. त्यांची पत्नी वनिता दौलत कुंदे वय ३१ ही १ मे २०२१ रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली आहे. वनिता कुंदे ही शरीराने सडपातळ, रंगाने निम गोरी, चेहरा उभट, कपाळावर गोंदलेले, नाक सरळ, केस काळे व लांब गळ्यात दोन सोन्याचे मण्यांची काळी पोत व सोन्याचे डोरले, कानात सोन्याचे कर्ण फुले, नाकात मुरणी, पायात चांदीचे तोरडे व पैंजण, उंची १५२ सेंमी,अंगात लाल रंगाची साडी, गुलाबी रंगाचे ब्लाउझ व गुलाबी रंगाचे स्वेटर, पायात लेडीज कापडी काळे रंगाचे बुट, शिक्षण आठवी, मराठी भाषा बोलते. या वर्णनाच्या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.