लक्ष्मण सोनवणे यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. भुसे यांच्या हस्ते ‘आदर्श कृषी विस्तारक’ पुरस्कार प्रदान

इगतपुरीनामा न्यूज – विविध शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारे पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांना शासनाचा ‘आदर्श कृषी विस्तारक’ पुरस्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिक येथे सुरु असलेल्या कृषी महोत्सवात हा पुरस्कार वितरण करण्यात आला. ना. दादा भुसे यांनी लक्ष्मण सोनवणे यांच्या कामाचे यावेळी कौतुक केले. सामान्य शेतकऱ्यांसाठी पत्रकारितेद्वारे काम केल्याची दखल घेऊन मला दिलेला पुरस्कार माझ्यासाठी राष्ट्रपती पुरस्काराएवढा मोठा आहे असे मनोगत लक्ष्मण सोनवणे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. शेतकरी मित्र म्हणून लक्ष्मण सोनवणे यांनी विविध वृत्तपत्रातून शेतीचे प्रश्न, अडचणी, विकासाच्या बाबी, जलयुक्त शिवार अभियान, कृषी तंत्रज्ञान आत्माच्या योजना, उल्लेखनीय बाबी, प्रगतशील शेतकरी, नवनवीन प्रयोग यावरील विविध लेखांद्वारे मांडले आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, आत्माचे निवृत्त प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, जि. प. कृषी विकास अधिकारी विजय धात्रक, इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे व्यवस्थापक हितेंद्र मोरे, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!