रिपाइं आणि महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा विजय निश्चित – केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले

इगतपुरीनामा न्यूज – महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना दिलेली उमेदवारी महायुतीला विजय संपादन करून देणारी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तळागाळातील कार्यकर्ते हिरामण खोसकर यांच्यासाठी प्रचंड कष्ट घेत आहेत. यामुळे आजच महायुतीचे उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांचा विजय घोषित झाल्यात जमा आहे. तरीही जास्तीतजास्त मतांनी हिरामण खोसकर यांना आमदार म्हणून दुसऱ्यांदा संधी द्यावी असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण वंचित समाज आणि रिपाई पक्ष महायुतीच्या सोबत आहे. इगतपुरी मतदारसंघात विद्यमान आमदार हिरामण खोसकर  यांचे निर्णायक काम असल्याने त्यांच्या विजयाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत असेही ना. रामदास आठवले म्हणाले. इगतपुरी येथील हॉटेल साई प्लाझा येथे हिरामण खोसकर यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले साहेब यांनी पक्षाच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी महायुती, रिपाई आणि मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवू अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

Similar Posts

error: Content is protected !!