इगतपुरीनामा न्यूज – लोकमत, लोकमत टाइम्स, लोकमत समाचार, लोकमत टाईम्स आणि कॅम्पस क्लबच्या संयुक्त विद्यमानाने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्रास् बिगेस्ट स्कूल ऑलम्पिक २०२३ लोकमत महा गेम्स-२०२३ चे आयोजन केले होते. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये इगतपुरी येथील आयडियल तायक्वांदो अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून घवघवीत यश मिळविले. यशस्वी खेळाडूंना घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर दादा लहाने, प्रकाशशेठ ताटीया यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून विशाल जगताप, दिनेश नायर, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सचिन जगताप, मिना जगताप, आनंद सावरकर आणि पंच म्हणून खंडू लहाने, इम्रान शेख, संध्या भटाटे, सोहन इंगळे, देवेंद्र भावसार यांनी काम पाहिले. धन्वी नेटावटे, सान्वी जगताप, गुंजन जगताप, विधी आडके, धनराज भगत, निखिल बोंडे, साईराज शिंदे, तबरेज अंसारी, स्वरा वाघ यांनी गोल्ड मेडल पटकावले. सिल्वर मेडल तृप्ती लहाने इनेश नायर, रुद्र लहाने, कोमल हरिभक्त, हितेन भटिजा, आस्था गिरे, हुजैफा सगीर शेख यांनी मिळवले. मयुर गिते, आर्यन राऊत, वेध करवा, अरमान हुसैन खाटिक यांनी ब्रॉन्ज मेडल प्राप्त केले. या स्पर्धेत १७ वयोगटातील कार्तिक जगताप, चैतन्य तोकडे, शुभम बोंडे, सुबोध जगताप, अम्मार अशफाक शेख, कलश पाटील, भूमी बिर्जे यांना गोल्ड मेडल मिळून त्यांची राज्य पातळीवरच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group