फार्मसी शाखेतील उमेदवारांना नोकरीच्या संधी

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

राष्ट्रीय पातळीवरील संधी
भारतीय स्टेट बँक या भारतातील अग्रगण्य बँकेत फार्मासिस्ट ( Pharmacist ) च्या जागा भरावयाच्या आहेत. फार्मसीमध्ये ज्या उमेदवारांनी डिप्लोमा, डिग्री, पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे त्यांच्यासाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. Clerical Cadre च्या या पदांसाठी साधारणतः ४७००० रूपये दरमहा पगाराची नोकरी चांगला अभ्यास करून परीक्षा व मुलाखत दिली तर मिळणार आहे. फार्मसी शाखेतील उमेदवारांना राष्ट्रीय पातळीवरील करिअरची चांगली संधी होय.

फार्मासिस्ट
Pharmacists in Clerical cadre च्या एकूण ६७ जागा भरावयाच्या आहेत. यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन अर्ज आणि फी पाठविण्याची अंतिम मुदत दि. ३ मे २०२१ ही आहे.  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी व सर्व माहिती सविस्तर मिळविण्यासाठी बँकेचे https://bank.sbi/careers  Or  https://www.sbi.co.in/careers या संकेतस्थळाचा उमेदवारांनी उपयोग करावा.

आरक्षण
भारतीय स्टेट बँकेत फार्मासिस्ट या पदांसाठी खालील प्रमाणे आरक्षण आहे
०१. Gen. 34 जागा
०२. OBC 14 जागा
०३. SC 09 जागा
०४. ST 04 जागा
०५. EWS 06 जागा

शैक्षणिक पात्रता
फार्मासिस्ट या पदासाठी पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे  ०१. Pass in SSC or its equivalent examination and minimum Diploma in Pharmacy ( D. Pharma ) OR
०२. Degree in Pharmacy ( B Pharma /M Pharma/ Pharma D ) or any equivalent  degree  in Pharmacy  from any recognized  university.

निवड प्रक्रिया
यासाठी ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत यामधून निवड केली जाईल. भारतातील विविध राज्यांमध्ये निवड झाल्यानंतर नोकरीसाठी जावे लागेल. कोणत्या राज्यात किती जागा आहेत याचीही माहिती वरील संकेतस्थळावर दिलेली आहे.

ऑनलाइन परीक्षा
टेन्टेटिव्ह ऑनलाइन परीक्षेची तारीख दि. २३ मे २०२१ ही असून ऑनलाइन परीक्षा ही २०० गुणांची आहे. यासाठी १५० प्रश्न असतील. या परीक्षेसाठी एकूण १२० मिनिटांचा वेळ असेल. बँकेने ठरविलेले मार्क या परीक्षेत मिळविलेले उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

परीक्षेचा अभ्यासक्रम
यासाठी खालील विषयांवर प्रश्न विचारले जातील
०१. General  Awareness 25 प्रश्न 25 मार्क
०२. General  English  25 प्रश्न 25 मार्क
०३. Quantitative Aptitude  25 प्रश्न 25 मार्क
०४. Reasoning  Ability  25 प्रश्न 25 मार्क
०५. Professional  knowledge  50 प्रश्न 100 मार्क  याप्रमाणे विषय, प्रश्नसंख्या व मार्कांचे वेटेज असेल हे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावे.

इतर माहिती
अर्ज करण्याची पध्दत, सर्वसामान्य सूचना, पदाचे कार्य, मुलाखत प्रक्रिया, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, ऑनलाइन परीक्षा माहिती, अनुभव, स्पेशल स्किल्स, कॉल लेटर, फी पाठविण्याची पद्धत आदी सर्वांची माहिती वर दिलेल्या संकेतस्थळावर सविस्तर दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी या दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. अर्ज वेळेत आणि बँकेच्या नियमाप्रमाणे भरल्यानंतर चांगल्या प्रकारे अभ्यास व मुलाखतीची तयारी केल्यास यश तुमचेच होय हे लक्षात घ्या.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

6 Comments

  1. avatar
    विलास जोपळे says:

    पात्रता असलेल्या उमेदवारांनी अवश्य या जाहिरातीचा उपयोग करावा…

  2. avatar
    प्रा . देविदास गिरी says:

    छान प्रतिक्रिया आणि धन्यवाद.

  3. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    अतिशय प्रभावी लेख

Leave a Reply

error: Content is protected !!