ब्रम्हचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या वतीने शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी डॉ. भाबड यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांना महाराष्ट्र राज्य ब्रम्हचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या वतीने शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. संस्थेचे सचिव सिध्देश्वरानन्द गुरू स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वती, राहुल महाराज साळुंके यांच्या उपस्थितीत विश्वशांती भारतीय संस्कृती सोहळा राष्ट्रीय नामसंकीर्तन महोत्सवात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राचार्य डॉ. भाबड यांना यापूर्वी इगतपुरी साहित्य मंडळाच्या वतीने ज्ञानदूत पुरस्कार प्राप्त झाला असून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासाला लागलेली आहेत. या पुरस्काराबद्दल संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई  पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, चिटणीस डॉ. सुनिल ढिकले, संचालक भाऊसाहेब खातळे यांनी अभिनंदन केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!