कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो : अतुल परचुरे ; मनसे चित्रपट सेनेकडून परचुरे प्रकरणी निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25

कलर्स मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात अभिनेते अतुल परचुरे यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांबाबत केलेला उल्लेख मुद्दाम झालेला नसून जाणीवपूर्वक अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. याबाबत परचुरे यांनी माफीही मागितलेली आहे. म्हणून ह्या प्रकरणी महाराष्ट्रातील नागरिकांनी हा विषय सोडून द्यावा अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट विभागाचे अमेय खोपकर यांनी कळविले आहे. त्यांनी दिलेले निवेदन खालीलप्रमाणे.

अतुल परचुरे यांना व्यक्तिश: ओळखतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा त्यांचा कोणताही इरादा नव्हता आणि नसणारही, याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. परचुरे यांनी केवळ पु.ल.देशपांडे यांचं लेखन सादर केलं. तरीही ज्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल माफीही मागितलेली आहे. त्यामुळे हा विषय आता इथेच थांबवावा अशी मी विनंती करतो.
सध्याचा काळ खूप कठीण आहे. अशा कठीण काळात एकमेकांच्या साथीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्वप्नातील आदर्श राष्ट्रनिर्माणासाठी सर्वजण झटू या, हे आवाहन यानिमित्ताने करतो.

आपला,
अमेय खोपकर, अध्यक्ष मनसे चित्रपट विभाग

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!