अंमली पदार्थ निर्मूलनासाठी आता स्वतंत्र पोलीस पथक : आजपासून नाशिक ग्रामीण पोलीसांचे गुटखा विरोधी अभियान – ५ : अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध कारवाईसाठी वाहतूक पोलीस सज्ज

इगतपुरीनामा न्यूज – जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांची आठ पथके कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे, दुर्गम भागातील हातभट्टी व्यवसायांचे निर्मूलन करण्यासाठी महिला पोलीसांची तीन पथके देखील कार्यान्वीत करण्यात आली आहेत. मागील महिन्यापासून नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायाविरुद्धची मोहीम आणखी तीव्र केली आहे. गत महिन्यात, नाशिक ग्रामीण पोलीसांनी एकूण ७६४ ठिकाणी धाडी टाकून, अवैध दारू, गुटखा, मटका जुगार, वेश्याव्यवसाय, जीवनावश्यक वस्तू कायदा, अंमली पदार्थ विरोधी कायदा या अन्वये कारवाई करून सव्वाचार कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. नाशिक ग्रामीण पोलीसांची सदरची गुटखा विरोधी व अवैध व्यवसाय विरोधी मोहीम ही दिनांक ६ ते ३० नोव्हेंबर या दरम्यान सुरू राहील. मालेगाव येथील अवैधव्यवसाय व विशेषतः अंमली पदार्थांचा बिमोड करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अनिल पठारे यांच्या अधिपत्याखाली एका स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील रस्ते अपघातात होणारे निरपराध नागरिकांचे मृत्यू रोखण्यासाठी, वाहतूक पोलीस बेदरकारपणे प्रवाशांची वाहतूक करणा-या वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहे. यादरम्यान, सर्व प्रकारच्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येणार असल्याने सर्व वाहनचालकांनी आपापल्या वाहनांची मूळ कागदपत्रे, वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी सोबत बाळगावे व सदर मोहिमेस पोलीसांना सहकार्य करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी हातभार लावावा, असे याद्वारे कळविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांना पोलीसांपर्यंत पोहोचविता यावी म्हणून नाशिक ग्रामीण पोलीसांनी ६२६२२५६३६३ ही हेल्पलाईन यापूर्वीच कार्यान्वीत केली असून आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती सदर हेल्पलाईनद्वारे पोलीसांना पोहोचवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!